अमळनेर (प्रतिनिधी):-
डांगरी येथील रहिवासी मच्छिंद्र सदाशिव भोई (वय-२४)या तरुणाने आज ता.२९ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी दोराच्या साहय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
सविस्तर वृत्तअसे की, मच्छिंद्र भोई याने घरातील सऱ्याला फाशी घेतल्याचे समजताच त्याला नातेवाइकानी तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले असता डॉक्टरानी त्याला मृत घोषीत केले. त्याच्यावर आज डांगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बालकृष्ण शिंदे करीत आहे.
मच्छिंद्र भोई याचे बी एस डब्लू चे शिक्षण झालेले होते.मात्र बऱ्याच दिवसांपासून तो वैफलयग्रस्त असल्याचेही (नैराश्य) सांगण्यात आले. तो सदाशिव भोई यांचा एकटा मुलगा होता.सहा मुलींचा पाठीवर मच्छिंद्र झाल्याने लाडाने वाढलेला मुलाने आत्महत्या केल्याने म्हातारे आई -वडील , व त्यांच्या विवाहित बहिणी यांचा आक्रोश मनाला हेलावनारा होता.त्याचे मृत्युचे कारण समजले नसून त्याच्या पच्यात आई वडील आणि सहा विवाहित बहिणी असा परिवार आहे.
