डहाणु येथील खुनातील आरोपींना पाचोर्‍यात अटक

0

पाचोरा –
डहाणु (मुंबई) येथे 11 जानेवारी 2019 रोजी किरकोळ कारणावरून एका भिकार्‍याचा खुण करण्यात आला होता. याप्रकरणी डहाणु पोलिसांना आरोपी हाती लागत नव्हते. मात्र मयताचे भावाने दिलेल्या अस्पष्ट रेखाचित्रावरुन व मोबाईल क्रमांकाचा सुगावा लागल्याने पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पोलिस नाईक राहुल सोनवणे, राहुल बेहरे यांनी अवघ्या चार तासात तीन आरोपींना डहाणु पोलिसांच्या ताब्यात दिले.
डहाणु येथे दि. 11 रोजी किरकोळ वादावरुन रस्त्यावर वस्तु विकणारे आणि एक भिकारी यांचेत हाणामारी झाली होती. यातील जखमी झालेल्या भिकार्‍याचा दवाखान्यात उपचार घेत असतांना मृत्यू झाला होता. भिकार्‍यास मारणार्‍यांचे चेहरे पुसटशे त्याचे भावाच्या लक्षात होते. व खुनातीन प्रमुख आरोपी संदिप चव्हाण यास अधुन मधुन पाचोरा येथील त्याचा साथीदार भ्रमणध्वनी व्दारे संपर्कात असायचा. आरोपींच्या तपासासाठी डहाणु येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कचरे यांचेसह दोन हवालदार येवुन पाचोरा पोलिसांना आरोपींची रेखाचित्रे दाखविली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पोलिस नाईक राहुल सोनवणे, राहुल बेहरे यांनी सावळा रचुन येथील आनंद नगर भागात मोबाईलच्या लोकेशन वरुन अवघ्या चार तासात खुनातील आरोपी संदिप चव्हाण यास ताब्यात घेऊन शितापीने इतर आरोपींविषयी विचारपूस केली असता त्याने त्याचे वडिल व काका खुनात सामिल असल्याचे सांगितल्यावरुन पाचोरा पोलिसांनी तीनही आरोपींना डहाणु पोलिसांच्या ताब्यात दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.