डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

0

जळगाव  | कंपनीत जाण्यासाठी एका तरुणाच्या दुचाकीवरुन लिफ्ट घेतल्यानंतर अवघ्या मिनीटभरात या दुचाकीला भरधाव वाळूच्या डंपरने धडक दिली. त्यात लिफ्ट घेणारा प्रौढ जागीच ठार झाला तर दुचाकीचालक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या दुचाकीचालकाचाही गुरुवारी मृत्यू झाला. ९ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता इच्छादेवी चौकात हा अपघात झाला होता.

अक्षय विजय पाटील वय (३५, रा. चंदू आण्णानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघाताच्या दिवशी अक्षयच्या दुचाकीमागे बसलेले सिद्धार्थ त्र्यंबक मोरे (वय ५५, रा. डॉ. आंबेडकर वसतिगृहाजवळ, सिंधी कॉलनी) यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटना अशी की, अक्षय पाटील व मोरे हे दोघे रेमंड कंपनीत कामाला होते. ९ मार्च रोजी सकाळी अक्षय हा दुचाकीने (एमएच १९ सीएल ६७७७) निघाला होता. सिंधी कॉलनीजवळ मोरे यांनी हात देऊन त्याच्या दुचाकीवर लिफ्ट घेतली. यांनतर दोघे इच्छादेवी चौकाच्या दिशेने निघाले. अवघ्या मिनिटभराचे अंतर कापल्यानंतर त्यांच्या दुचाकीस पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने (एमपी ०४ जीए ३४९२) जोरदार धडक दिली. या अपघातात मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षय गंभीर जखमी झाला होता. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू होते. या दरम्यान, गुरुवारी अक्षयची प्राणज्योत मावळली. डंपचालक धीरज मोहन धनगर (वय १८, रा. कडगाव) याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.