ठाणे पत्रकार संघातर्फे पत्रकारदिन साजरा

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करून आज ठाणे पत्रकार संघातर्फे पत्रकारदिन साजरा करण्यात आला.

ठाणे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भूपेंद्र वाळंज, अध्यक्ष दिपक सोनावणे, उपाध्यक्ष नितिन हासे, सरचिटणीस देवेेंद्र गोरेगावकर, राजेंद्र अहिरे, मधुरा कदम, विकास मिराशी, राहुल पाटील, विजय कळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाणे पत्रकार संघातर्फे आजतागायत राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती वाळंज यांनी दिली. सोनावणे यांनी पत्रकारितेमधील बदलांचे आव्हान स्विकारण्यासाठी पत्रकारांनी स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करून घ्यावे असा सल्ला दिला. कोरोना काळात दिवंगत झालेल्या पत्रकारांचे स्मरण करीत त्यांनी पत्रकारांना आपल्या आरोग्याची काटेकोरपणे काळजी घेण्याचे आवाहन केले.

हासे यांनी पत्रकारांनीच पत्रकारांच्या कल्याणासाठी एकत्रित झटले पाहिजे, असे मत मांडले तर गोरेगावकर यांनी पत्रकारितेमधील नैतिकता जपत समाजाभिमूख लिखाण करावे असे प्रतिपादन केेले. अहिरे यांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या अडीअडचणींची सोडवणूक करण्याचे आवाहन यावेळी केले. कोरोना नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.