ठाकरे स्मार्ट डिजिटल कोचिंग क्लासमध्ये आ.गिरिष महाजनांच्या हस्ते टॅबचे वाटप

0

जामनेर (प्रतिनिधी) : दि १७  जामनेर तालुक्यात तसेच ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उच्चप्रतीचे व दर्जेदार शिक्षण मिळावे ग्रामीण भागातील विद्यार्थी अद्यावत शिक्षणापासून वंचित राहता काम नये या उदात्त भावनेतून शिक्षणाचा वसा घेतलेले जामनेर तालुक्यातच नव्हे तर जिल्याला परिचित असलेले जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेतील निवृत्त शिक्षक आदरणीय के आर ठाकरे सर यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या माध्यमातून जामनेर शहरात ठाकरे स्मार्ट डिजिटल कोचिंग क्लास विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत असून कोरोना या आजाराच्या संकटातही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिकवीत आहेत.

दि १६ रोजी राज्याचे माजी मंत्री आ गिरिष महाजन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता यावे या साठी ठाकरे स्मार्ट डिजिटल कोचिंग क्लास च्या माध्यमातून टॅब चे वाटप करण्यात आले या वेळी आ महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहुन दीप प्रज्वलन केले आ गिरिष महाजनांचे संचालिका ऐश्वर्या ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या टॅब वाटप प्रसंगी आ महाजन यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना जळगांव जिल्ह्यात प्रथमच असा स्तुत्य उपक्रम राबविल्या बद्दल ठाकरे स्मार्ट डिजिटल कोचिंग क्लासच्या संचालिका एश्वर्या सुनील ठाकरे याना शुभेच्छा देत जामनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व अद्यावत शिक्षनाचे दालन ठाकरे स्मार्ट डिजिटल कोचिंग क्लास च्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले यावेळी क्लास मधील १० विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात आ महाजन यांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.