ठाकरे सरकारच्या खातेवाटपाचा तिढा सुटला !

0

मुंबई : ठाकरे सरकारच्या मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत तिन्ही पक्षांत एकमत झालं असून खातेवाटपाचा तिढाही सुटला आहे. आज (गुरुवार 2 जानेवारी) दुपारपर्यंत खातेवाटप जाहीर होणार आहे. मंत्रालयात चार तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिती दिली.

पालकमंत्र्यांबाबत एकमत झाल्याने खातेवाटप जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुपारपर्यंत खातेवाटपाचा जीआरनिघण्याची शक्यता आहे. मॅरेथॉन बैठकीनंतर खातेवाटपावर तोडगा निघाला. मंत्रालयात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीत वाद सुरु असल्यामुळे मंत्र्यांना खाती जाहीर करण्यात येत नसल्याची चर्चा होती. मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या तिन्ही पक्षातील आमदारांनी नाराजीचे झेंडेही उभारले होते. प्रकाश सोळंके यांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारलं होतं, तर संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी राडा केला होता. खासदार संजय राऊत यांचे आमदार बंधू सुनिल राऊतही मंत्रिपद न मिळाल्याने खट्टू असल्याची चर्चा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here