ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ई-पासची अट केली रद्द

0

मुंबई । केंद्राने नुकतंच आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी कोणत्याही वेगळ्या परवानगीची गरज नसल्याचं सांगितलं होतं. त्यामंतर आता राज्य सरकारनंही राज्यातील ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनलॉक-४ संदर्भात नियमावली जाहीर केली आहे.

राज्य सरकारच्या या नियमावलीनुसार आता जिल्हांतर्गंत प्रवास करताना ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. आता ई-पासशिवाय राज्यात प्रवास करता येणार आहे. केंद्रानं परवानगी दिल्यानंतरही राज्यात ई-पासची अट कायम ठेवण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टीकेनंतर अखेर राज्य सरकारनं ई-पास संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

‘अनलॉक ४’ ची नियमावली जाहीर करताना केंद्र सरकारने मेट्रो सेवा, सार्वजनिक कार्यक्रम, शैक्षणिक संस्था यांना अंशत: परवानगी दिली. तसंच राज्यांतर्गत व आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची गरज नसल्याचेही केंद्र सरकारने म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यात कोणत्या सवलती देता येतील याचा आढावा घेण्यात आला होता. दरम्यान, केंद्र सरकारकडून घोषणा झाल्यानतंर राज्य सरकारच्या नियमावलीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार राज्य सरकारने निमयावली जाहीर केली असून ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे.

राज्य सरकारने खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी दिली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरु होण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत. जिम सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आलेली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.