Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»ठरलं…पुरनाड चेकपोस्टवर अनधिकृत पंटरांना‘नो ऐन्ट्री’
    जळगाव

    ठरलं…पुरनाड चेकपोस्टवर अनधिकृत पंटरांना‘नो ऐन्ट्री’

    By March 17, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : पुरनाड चेकपोस्टवर एकही अनधिकृत पंटर राहणार नाही. असा कुणी पंटर अढळलाच तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वास प्रादेशीक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी आज दिले. पुरनाड ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आ.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संबंधीत अधिकार्‍यांची बैठक झाली. आ.पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पुरनाड ग्रामस्थांनी आपले आंदोलन रद्द केले आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुनगाव येथील चेकपोस्टवर शासनाचा अधिकारी जमा होणारा महसूल न घेता अवैध मार्गाने इथे पंटर नेमून पैसा वसूल करतात. या पार्श्वभुमीवर चेकपोस्ट वरील पंटर कायमस्वरुपी बंद करण्यात यावे, कर बुडव्या वाहनधारकांना चपराक बसविण्यात यावी अन्यथा 16 मार्च पासून आंदोलनाचा इशारा पुरनाड ग्रामस्थांनी दिला होता.  यासंदर्भात दिनांक 24/02/2020 रोजी निवेदन दिलेले होते. मात्र, या निवेदनाला काही प्रत्यूत्तर न आल्याने पुरनाड ग्रामस्थांतर्फे स्मरण पत्र देण्यात आले. 16 मार्च पासून आंदोलन छेडण्याचा ईशारा या स्मरण पत्रात दिला होता.

    या पत्राची दखल घेत आ.चंद्रकांत पाटील यांनी संबंधित परिवहन अधिकार्‍यांची बैठक घेतली. अनधिकृत पंटर असतील तर हा प्रकार बंद करण्याची सुचना आ.पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या. प्रादेशिक परिवहन विभागाने याविषयी लेखी आश्वासनच दिले आहे. प्राप्त तक्रारी अन्वये परिवहन विभागाच्या भरारी पथकाद्वारे पुर्नाड नायगाव रसत्यावरील अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे. तक्रारी नुसार चेकपोस्टवर कोणताही खाजगी व्यक्ती वसूली करत नाही. असे आढळल्यास अवैध मार्गाने वसूली करणार्‍या पंटरवर कार्यवाही करण्यात येईल.  ही धडक कार्यवाही भविष्यातही सुरु राहील अशा आशयाचे लेखी पत्रच परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.

    लेख आश्वासन मिळाल्यामुळे पुरनाड वासियांकडून समाधान व्यक्त होत आहे. अवैध वाहतूकीमुळे पुरनाड ते नायगाव या शेत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. याचा शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आ.चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने आम्हाला न्याय मिळण्याचे चिन्ह दिसत असल्याचे पुरनाड परिसरातील शेतकर्‍यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी गुलाबराव पाटील, प्रमोद पाटील, भागवत कोळी, मनोज पाटील, अनिल पाटील, पप्पू पाटील, हर्षल पाटील, प्रदीप पाटील, महेश पाटील व ग्रामस्थ ऊपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif