ठरलं ! निर्भयाच्या गुन्हेगारांना ‘या’ तारखेला लटकवलं जाणार फासावर

0

नवी दिल्ली : निर्भया सामुहिक बलात्कारप्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयाने चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं आहे. चारही नराधमांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फासावर लटकवलं जाणार आहे. मुकेश कुमार सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय कुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार (३१) अशी या दोषींची नावं आहेत.


११ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या आई-वडिलांनी दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली होती. यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयानं डेथ वॉरंटमध्ये २२ जानेवारी रोजी दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयानं ३१ जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबवली होती. हे सगळे दोषी न्याय प्रक्रियेशी खेळत असल्याचा आरोप निर्भयाच्या आई-वडिलांनी केला होता. आज तिसऱ्यांदा दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्यात आलंय. यासाठी आम्हाला अधिक त्रास सहन करावा लागला. परंतु, अखेर डेथ वॉरंट निघालं याचं समाधान आहे. ३ मार्च रोजी दोषी फासावर चढतील, अशी मी आशा करते, अशी प्रतिक्रिया या निकालानंतर निर्भयाची आई आशा देवी यांनी दिलीय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.