Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»ट्रॅक्टर पेटवून दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    ट्रॅक्टर पेटवून दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क

    वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिल्याने महिला जखमी होऊन संतप्त नागरिकांनी दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना मंगळवार ९ मे रोजी घडली होती. याप्रकरणी रात्री ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. .

    याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात मंगळवारी ९ मे रोजी दुपारी २ वयाच्या सुमारास ट्रॅक्टर चालक सुनील अशोक पाटील हा ट्रॅक्टर (एमएच १९,डी ६३५४) मधून विनापरवाना वाळू वाहतूक करीत होता. त्यावेळी ट्रॅक्टरने प्रवासी रिक्षा (एमएच १९ सीडब्ल्यू १४१३) या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा चालकासह तीन प्रवाशी महिला जखमी झाले होते. हे घटना घडल्यानंतर आव्हाणे गावातील संतप्त झालेल्या नागरिकांनी ज्वलनशील पदार्थ टाकून दोन्ही ट्रॅक्टरला पेटवून दिले होते. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक सुनील अशोक पाटील, ट्रॅक्टर चालक रेवसिंग उर्फ राहुल वीरसिंग बारेला, जगदीश बाबूलाल ढोले, देवेंद्र दत्तात्रय पाटील, किरण पांडुरंग ढोले, काशिनाथ शिवाजी ढोले, सय्यद इकबाल सय्यद गफार आणि शेख रऊफ शेख युसुफ सर्व रा. आव्हाणे ता. जि. जळगाव यांच्या विरोधात गैरकायद्याने मंडळी जमवून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करून ट्रॅक्टर पेटवून दिल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

    #crime #talukapolice jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif