ट्रम्प यांचा मोठा निर्णय ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

0

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि वाढता संसर्ग टाळण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.  अमेरिकेमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.  अमेरिकेत 1 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले असून त्या संदर्भात व्हाइट हाऊसमध्ये घोषणा करण्यात आली.


15 कोटी लोकांना या व्हायरसची लागण होऊ शकते अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याचं आव्हान सर्व देशांसमोर असल्याचं ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. येणाऱ्या काळात आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. आता त्याग केला तर पुढे आपल्याला त्याचा फायदा होईल. पुढील आठ आठवड्यांचा कालावधी कठिण असेल,” असं ट्रम्प यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.