ट्रकच्या भीषण अपघातात पाच कामगार जागीच ठार; ११ जण गंभीर जखमी

0

नवी दिल्ली : औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर १६ कामगारांच्या मृत्यूची घटना नुकतीच घडली. दरम्यान, आता आणखी एका दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. आंब्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. या भीषण अपघातात पाच कामगार जागीच ठार झाले, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहे. शनिवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमधील पाथा गावाजवळ ही घटना घडली.

मध्य प्रदेशातील नरसिंगपूरजवळ असलेल्या पाथा गावानजिक एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघातात झाला. आंब्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये १८ मजूर होते. हा ट्रक हैदराबादवरून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे जात होता. दरम्यान, पाथाजवळ ट्रक उलटला. यात पाच मजूर जागीच ठार झाले. ११ मजूर गंभीर झाले आहेत.

नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. तेलंगानातील हैदराबाद येथून आग्रा येथे जाणाऱ्या या ट्रकमध्ये १८ मजूरही आग्रा येथे जात होते, असं त्यांनी सांगितलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.