ट्रकची कारला धडक ; ५ जागीच ठार ५ जखमी

0

दळवेल गावाजवळील घटना ; पाचोऱ्यातील वाणी कुटुंबीयांचा मृतांमध्ये समावेश
जळगाव – भरधाव ट्रकने कारला दिलेल्या जोरदार धडकेत कार पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला . यात पाचोऱ्यातील वाणी कुटुंबीयांतील चौघांचा समावेश असून इतर पाच जण जखमी झाल्याची घटना महामार्ग क्रमांक ६ वरील दळवेल गावाजवळ आज सकाळी येथे घडली .मृतांमध्ये तीन महिलांचा तर २ पुरुषांचा समावेश आहे. मृत पावलेले सर्व जण पाचोरा येथील रहिवासी आहेत.


याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दळवेल गावाजवळील गुडलक पेट्रोल पंपासमोर भरधाव ट्रकने कारला दिलेल्या जोरदार धडकेत कार पलटी झाली . या अपघातात चेतन महाजन , प्रितम वाणी , अनिता रमेश वाणी , शांताबाई सुरेश वाणी ,नीलिमा वाणी सर्व रा. पाचोरा हे जागीच ठार झाले . तर शितल वाणी, रमेश वाणी, बंडू वाणी, दिपाली वाणी व एक 6 वर्षांची मुलगी सर्व रा. पाचोरा हे अपघातात जखमी झाले . जखमींना उपचारांसाठी धुळ्यातील रुग्णालयात हलवण्यात आले .

——–यांनी केली मदत ——
हा अपघात होताच पंपासमोरील शेतात पहाटे ४ वाजेच्या सुमारास दूध काढण्यासाठी आलेले चतुर गिरासे व अरुण चतुर गिरासे यांना मोठा आवाज ऐकू आल्याने त्यांनी महामार्गावर धाव घेतली. गुडलक पेट्रोल पंपावरील भानुदास मांगो पाटील,अतुल पन्नालाल परदेशी,हिम्मत सुरेश भोई,मिर्झा व कालू सैय्यद,१०८ चे डाँ धनंजय पाटील चालक रोशन पाटील यासह गावकऱ्यांनी उलटलेली गाडी सरळ करून जखमी व मृतास गाडी तोडून बाहेर काढून रुग्णालयात हलविले. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.