ट्रकखाली आल्याने महिला जागीच ठार

0

मुक्ताईनगर : ट्रकने कट मारल्यामुळे दुचाकीवर मागे बसलेली ५२ वर्षीय महिला खाली पडून, ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन ठार झाल्याची घटना गुरूवारी सकाळी १०.३० वाजता नायगावजळ घडली.रत्नमाला सुभाष सैतवाल (वय ५२) असे या मृत महिलेचे नाव आहे.

लग्न सोहळ्यासाठी, रावेर येथील सुभाष केशरीलाल सैतवाल सपत्नीक मोटारसायकलने (क्रमांक-एमएच.१९-सी.ई.८९३३) मुक्ताईनगरकडे येत होते. नायगावजवळ बेलसवाडीकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच.१९-झेड.६२७७) त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकी फेकली गेली. तर दुचाकीवर मागे बसलेल्या रत्नमाला सैतवाल (वय ५२) ट्रकच्या चाकाखाली आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.