पारोळा – तालुक्यातील टोळी येथे २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिला विष पाजून हत्या केल्याची घटना घडली होती. आज या पीडित तरुणीच्या परिवाराची खासदार उन्मेश पाटील यांनी भेट घेतली.यावेळी नरभक्षकांना फाशीची शिक्षा मिळणेसाठी सदर खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून आमच्या कुटुंबास पोलीस संरक्षण मिळावे. या घटनेची सखोल चौकशी करून परिवाराचे योग्य रीतीने पुनर्वसन करावे. अशी मागणी आज पीडित तरुणीच्या आईने खासदार उन्मेश दादा पाटील यांचेकडे केली आहे. आज खासदार उन्मेश दादा पाटील तसेच अनु जाती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष उदगीरचे माजी आ. सुधाकर भालेराव, पारोळा नगराध्यक्ष करन पवार यांनी टोळी येथे पीडित तरुणीच्या परिवाराची भेट घेतली. याप्रसंगी मुलीचे मामा सुरेश पाटोळे यांनी सर्व आपबिती कथन केली. पीडित तरुणीची आईवर या भयंकर घटनेचा परिणाम झाला असून त्यांनी हुंदका देत झालेल्या घटनेची माहिती खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार सुधाकर भालेराव यांना सांगितली.अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष सर्जेराव जाधव(जालना), जालिंदर शेंडगे(औरंगाबाद) माधव टेपाले, शिवशंकर धुप्पे, सोमिनाथ भालेराव,किरण गुढेकर, रामदास भालेराव,प्रदीप जाधव, लखन वाघमारे, रवींद्र चौधरी, पी. ओ.महाजन सर आदी उपस्थित होते.