टिटवी येथे १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या

0

पारोळा | प्रतिनिधी 

तालुक्यातील टिटवी येथे ६ रोजी रात्री १० वाजता विहिरीत उडी मारून १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आशाबाई पुना खैरनार (वय १९) ही ६ रोजी रात्री ९ वाजता मोठी बहिण खटाबाई यांच्याकडे जेवणास जाते असे सांगून गेली. ती बराच वेळ झाल्यानंतरही घरी परतली नाही. त्यामुळे शिवदास पुना खैरनार यांच्या कुटुंबीयांनी तपास केला असता आशाबाई बहिणीच्या घरी गेलीच नसल्याची माहिती मिळाली. गावात तपास केल्यावर गावालगत असलेल्या दगडू धनराज पाटील यांच्या विहिरीजवळ आशाची चप्पल दिसून आली. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांनी विहिरीत शोध घेतला असता पाण्यात आशाचा मृतदेह आढळून आला. याबाबत टिटवी येथील शिवदास पुना खैरनार यांच्या माहितीवरून पाराेळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सुधीर चौधरी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.