सलमान खाननं जोधपूर सत्र न्यायालयात जामीनासाठी आणि शिक्षा रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर सुनावणी झाली. वकिलांनी न्यायालयात सलमानची बाजू मांडली. सलमानलाही संशयाचा लाभ मिळाला पाहिजे, असं वकिलांनी सांगितलं. या खटल्यातील साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असंही न्यायालयानं सांगितलं. युक्तिवाद संपल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला आहे. उद्या, शनिवारी सकाळी न्यायालय सलमानच्या जामिनावर फैसला सुनावणार आहे. त्यामुळं आजची रात्रही सलमानला तुरुंगातच राहावं लागणार आहे.
जोधपूर: काळवीट शिकार प्रकरणी ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेल्या सलमान खानला आजची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. सत्र न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. न्यायालयानं निकाल राखून ठेवला असून, जामीन अर्जावर उद्या फैसला सुनावण्यात येणार आहे.