अमळनेर(प्रतिनिधी) : रस दे म्हणून रसवंती मालक व त्याला शिवीगाळ करून लोखंडी सळईने मारहाण करून रसवंतीची तोडफोड करणाऱ्या म्हसले येथील 10 ते 12 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
टाकरखेडे येथील रोमन मनवर पिंजारी व लोणे येथील करणसिंग जितेंद्र पाटील यांची धरणगाव रस्त्यावर लोणे शिवारात रसवंती असून 18 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास सुभाष रामचंद्र पाटील, भूषण रामचंद्र पाटील, विजय पाटील, संतोष बाळू पाटील, भैय्या पाटील व इतर 10 ते 12 इसम यांनी गर्दीने येऊन रस दे असे सांगून शिवीगाळ सुरू केली त्यावेळी रोमन याने शिवीगाळ करू नका असे सांगितले असता त्यांना राग आला त्यांनी रोमन व करण सिंग यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्याचवेळी शुभम याने हातात लोखंडी सळई आणून रोमन च्या डोक्यात मारून जखमी केले घाबरून रोमन व करणसिंग जवळच्या मक्याच्या शेतात लपून बसले त्यावेळी मारहाण कर्त्यांनी रसवंतीचा मंडप, खुर्च्या, टेबल, मोटरसायकल आदी वस्तूंची तोडफोड केली थोड्या वेळाने गावातील लोक आल्यानन्तर ते दोघे बाहेर आले.
दवाखाण्यात उपचारानंतर अमळनेर पोलिसात रोमन पिंजारी याने फिर्याद दिल्यावरून वरील पाच व इतर 10 ते 12 जंनविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत.