विविध सामाजिक नाटीकांनी केले प्रेक्षकांचे मनोरंजन
जामनेर (प्रतिनिधी):– तालुक्यातील टाकरखेडा येथे जि प उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा कलारंग कार्यक्रम दुपारी १२ ते ४ या वेळेत पार पडला. यात इयत्ता १ली पासून ७वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अनेक गीतांचे नृत्यासह अप्रतिम असे सादरीकरण केले. प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या या कला अविष्काराला जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.
कलारंग कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक नाटीका सादर केल्या. त्यात व्यसनाधीनता, शौचालय, अहिराणी नाटीका मंडाबाई, सर्वधर्मसमभाव अशा नाटीकांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन व उद्बोधन केले. यावेळी पालकांनी व प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांना भरपूर बक्षिसे दिली. कलारंग कार्यक्रमासाठी गावातील हरदास उघडे व सुधाकर गोसावी यांनी विनामूल्य स्टेज मंडपाची मदत केली.कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सरपंच समाधान पाटील, समितीतील सदस्य शिवाजी डोंगरे, अमृत दांडगे,नाना सुरळकर,रमेश शिंगार,संतोष भोई, गणेश केणे,अलकाताई सूरळकर, सविता भोई,सरिता उघडे, वैशाली गाडीलोहार सुनिता गाडी लोहार,प्रतिभा सुरळकर,ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ शिंदे,बाळू भोई, फोटो ग्राफर बापू लोहार, गावातील प्रतिष्ठित नागरीक,भोई समाज बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी संजीव भोई, युवक, युवती, विद्यार्थी,महिला व पुरुषांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक देवाजी पाटील, रविंद्र चौधरी, विकास वराडे, जयंत शेळके, रामेश्वर आहेर श्रीम जयश्री पाटील, श्रीम छाया पारधे, व गावातील मयुर विद्याधर पाटील, शिक्षण प्रेमी नाना सुरळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.