टपाल विभागाचे काम कौतुकास्पद ; माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे

0

भुसावळ (प्रतिनिधी)- : डाक विभागातर्फे विविध सोयी सुविधा प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा यासाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. टपाल विभागाचे हे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले.

भुसावळ मुख्य डाकघरात दि. 4 ते 14 जानेवारी दरम्यान विशेष डाक मेळावा आयोजित करण्यात आला असून मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून श्री. नेमाडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डाक विभागाचे अधीक्षक पुरुषोत्तम सेलूकर, रोटरी क्लब ऑफ रॉयल्सचे गणेश फेगडे, डॉ. जगदीश पाटील, सहाय्यक अधीक्षक के. बी. जाधव, एस. एन. म्हस्के, पोस्ट मास्तर एजाज शेख उपस्थित होते. उद्घाटक उमेश नेमाडे यांनी डाक विभागाच्या विविध योजनांचे कौतुक करून नागरिकांसाठी या योजना किती लाभदायी आहेत याबाबत सांगितले. गणेश फेगडे यांनी पोस्ट कार्यालयाचा जनसामान्यांशी असलेला संबंध आणि पोस्टाचे कामकाज यांचा अनुभव कथन केला. डॉ. जगदीश पाटील यांनी पोस्ट कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा यांच्या कार्याचा गौरव केला. अधीक्षक पुरुषोत्तम सेलूकर यांनी डाक विभागाच्या विशेष मेळाव्याबाबत माहिती दिली. बचत खाते, सुकन्या योजना खाते, आधार अपडेट, टपाल जीवन विमा, प्रधानमंत्री विविध योजना, पोस्ट बँक यासह विविध योजनांची माहिती दिली. नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी विशेष डाक मेळावा आयोजित केला असल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन हेमंत कुरकुरे यांनी तर आभार कार्यालयीन सहाय्यक राकेश पाटील यांनी मानले.

 

विशेष डाक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे सोबत अधीक्षक पुरुषोत्तम सेलूकर, गणेश फेगडे, डॉ. जगदीश पाटील, के. बी. जाधव, एस. एन. म्हस्के, एजाज शेख

Leave A Reply

Your email address will not be published.