जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ, स्वच्छता कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा देत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. ऑन ड्युटी २४ तास सेवा देत या क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाविरुद्धच्या लढाईत एखाद्या सैनिकाप्रमाणे लढत आहेत. त्यामुळे या सर्व लढवय्यासाठी काही सामाजिक संघटना खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून झाल्टे ग्रुपतर्फे शहरातील निराधार गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करत चहा, बिस्कीट, बिसलेरीचे वाटप केली. यावेळी कायद्याचे पालन करण्यात आले.
दरम्यान, यावेळी महानगरपालिकेचे उप विभागीय अभियंता चंद्रकांत सोनगिरे, कर अधीक्षक चंद्रकांत पंधारे, कैलास पंधारे यांचा सत्कार झाल्टे ग्रुप तर्फे करण्यात आला. याप्रसंगी झाल्टे ग्रुपचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते योगेश अहिरे, दिलीप चौधरी, चेतन अहिरे उपस्थित होते.