भुसावळ – कोणत्या ठिकाणी, कोणती झाडे, कधी लावावीत याविषयीचा अभ्यास वृक्षारोपण करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. बऱ्याच जणांना याची माहिती नसल्याने वृक्षारोपणानंतर ती झाडे पुरेशी काळजी घेतली नाही तर बराच काळ तग धरू शकत नाही. याकरिता झाडे लावून ती जगवण्यासाठी संगोपनाचाही विचार करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी केले.
निसर्ग व पर्यावरण सामाजिक प्रदूषण निवारण मंडळाच्या जळगाव जिल्हा कार्यकारणीच्या पहिल्या ऑनलाईन सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी जळगाव जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी 5 जूनपासून जळगाव जिल्हा कार्यकारिणीने केलेल्या कामाचा आढावा घेतला तसेच भविष्यात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी माहिती दिली. कार्याध्यक्ष डॉ. जगदीश पाटील यांनी नियोजन केले. वृक्षमित्र आबासाहेब मोरे, जिल्हाध्यक्ष नाना पाटील, उपाध्यक्ष राजेश पाटील, वैशाली पाटील, नंदलाल पाटील, सचिव संजय ताडेकर, सहसचिव विजय लुल्हे, अनिता पाटील, सहसंघटक माधुरी अहिरे, कार्याध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, खजिनदार संजीव पाटील, मार्गदर्शक सल्लागार प्रा. अविनाश कुमावत, सल्लागार सदस्य सॅम सेफर्ड, नरेंद्र मोरे, राहुल पाटील, नरेंद्र नाईक, रविंद्र खरादे, तज्ञ मार्गदर्शक सुरेंद्रसिंग पाटील, संजीव बोठे आदींनी सभेत सहभाग घेवून आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार डी. के. पाटील यांनी मानले.