Saturday, October 1, 2022

झाकीर नाईकच्या NGOवरील बंदी वाढवली

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

गृह मंत्रालयाने झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर  आणखी ५ वर्ष बंदी वाढवली आहे. झाकीर नाईकच्या एनजीओवर पहिल्यांदा नोव्हेंबर २०१६ मध्ये यूएपीए अंतर्गत बंदी घालण्यात आली होती. झाकीर नाईकवर भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. झाकीर नाईकला फरार घोषित करण्यात आलं आहे. पीस टीव्हीवर दाखवलेली त्यांची भाषणे वादग्रस्त असल्याचा आरोप आहे. दरम्यान, त्यांची एनजीओ आयआरएफचे कार्यालय मुंबईतील डोंगरी येथे होतं.

- Advertisement -

- Advertisement -

बांगलादेशची राजधानी ढाका येथे २०१६ मध्ये बॉम्बस्फोट झाला तेव्हा झाकीर नाईकचं नाव पहिल्यांदा समोर आलं. या घटनेनंतर अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी झाकीरच्या भाषणाने प्रभावित झाल्याचे सांगितलं होतं. ढाका येथे झालेल्या या स्फोटात २२ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने झाकीरविरुद्ध या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास केला. प्राथमिक तपासानंतर झाकीर आणि आयआरएफवर बंदी घालण्यात आली. आपल्या भाषणातून धर्मांमध्ये द्वेष पसरवल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्यानंतर एक अहवालही समोर आला, ज्यामध्ये IRF ने ४००-५०० स्त्री-पुरुषांचं धर्मांतर केल्याचं समोर आलं.

यानंतर झाकीर नाईकविरुद्ध महाराष्ट्र आणि केरळमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले. त्याचबरोबर आयआरएफला परदेशातूनही निधी मिळत असल्याचं तपासात समोर आलं आहे. झाकीरचे पाकिस्तान आणि इतर दहशतवादी संघटनांशी असलेले संबंधही समोर आले. झाकीर नाईक सध्या मलेशियामध्ये असून त्याला आणण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या