Saturday, January 28, 2023

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल

- Advertisement -

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

अण्णा हजारे यांना अशक्तपणा जाणवायला लागल्याने त्यांना आज सकाळी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अण्णा यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर एन्जॉग्राफी झाली असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्र्यांकडून यांच्याकडून चौकशी

दरम्यान, अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

तसेच लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरु आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा, अशी भावना व्यक्त केली.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे