ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्या घरांवर सीबीआयची धाड

0

नवी दिल्ली/मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्या मुंबई आणि दिल्लीतील निवासस्थानावर सीबीआयने आज सकाळी छापे टाकले. लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीमध्ये अनियमितता केल्याचा ठपका दोघांवरही ठेवण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर हे दोघेही लॉयर्स कलेक्टिव्ह नावाची संस्था चालवतात. या संस्थेसाठी त्यांनी विदेशातून फंडिंग घेऊन निधी विनियमन कायद्याचं (एफसीआरए) उल्लंघन केल्याचा या दोघांवर आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयकडे या दोघांविरोधात केस दाखल करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संस्थेचं लायसन्सही रद्द केलं होतं. या पार्श्वभूमीवर सीबीआयने जयसिंग आणि ग्रोव्हर यांच्या घरावर छापे मारून सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.