ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा नाही ; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

0

 मुंबई | विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या. तर भाजपाला धुळे-नंदुरबारची एकमेव जागा मिळाली.  महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा सूफडासाफ झाला आहे. तरीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा नाही अस देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे.

 

विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला, चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली, विश्लेषण करायचं झालं तर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली. स्ट्रॅटेजी चूक झाली असेल तर तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याचं आकलन चुकलं. आता आम्हाला कळलं त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू अस देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

ते पुढे म्हणाले, ही निवडणूक अचानक लागली, त्यामुळे अनेक रजिस्ट्रेशन राहिलं. आम्ही रजिस्ट्रेशनमध्ये कमी पडलो. आता ही गोष्ट बाजूला, जे जिंकले त्यांना शुभेच्छा.. एक गोष्ट नमूद करावी, ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही. दोन पक्षांना फायदा झाला, जसं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, तसं ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा येत नाही त्यांनीही आत्मचिंतन करावं अस ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.