जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल कोरोना पॉझिटिव्ह

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून, आता बॉलीवूडसुद्धा या कोरोनाच्या जाळ्यात पुन्हा एकदा अडकले आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचालला कोरोनाची लागण झाली आहे.

मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जॉनने एक खुलासा केला आहे की, ते दोघेही पती-पत्नी वॅक्सीनेटेड असून, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली होती. जॉन आणि त्याची पत्नी प्रिया दोघेही घरामध्येच क्वारंटटाइन झाले आहेत.जॉन हा काही दिवसांपूर्वी अशा एका व्यक्तीच्या संपर्कात आले होते ज्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

यासंदर्भात जॉनने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. जॉनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये याची संपूर्ण माहिती दिली आहे. ” मी तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रिया आणि माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही दोघेही आता घरामध्येच क्वारंटटाईन असून कोणाच्याही संपर्कात नाही आलो. याशिवाय आम्ही दोघांनीही लस घेतली असून, आम्हाला कोरोनाचे सौम्य लक्षणं दिसून आले आहेत.तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि मास्क वापरा’, असे जॉनने पोस्टमध्ये लिहिले आहे.

कोरोनाच्या विळख्यात बॉलीवूड

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नोरा फतेहीनंतर आता जर्सी फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मृणालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. मृणालला थोडा थकवा जाणवल्याने तिने शनिवारी कोरोना चाचणी केली असता तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मृणालला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. मृणाल सध्या होम क्वारंटाइन असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.