जैन हिल्स येथे जीएसटीवर दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात

0

जळगाव | प्रतिनिधी
वेस्टर्न इंडिया रिजन कौन्सिलच्या जळगाव सीए शाखेतर्फे  जैन हिल्स येथे जीएसटी(गुड्स अँड सर्व्हिस कॉन्फरन्स) दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सीसीएम मेंबर आणि इनडायरेक्ट टॅक्स कमिटीचे सीए प्रफुल छाजेड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली . यावेळी प्रति सावला , उमेश शर्मा , यशवंत कासार यांच्यासह सीए आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यशाळेबद्दल बोलताना प्रफुल छाजेड म्हणाले कि , देशात जिएसटी लागू झाल्यापासून लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत . तसेच त्यांना रिटन्स कसे भरावे याबाबत कॉमर्सच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन असोशिएशनतर्फे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले . व्यापारी,विद्यार्थी आणि नागरिकांसाठी हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . यावेळी त्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून जीएसटीबाबत विविध माहिती देण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले. भारत सरकारच्या सहाय्याने जालगाव तसेच खान्देशात विविध कॉलेजमधील खासकरून कॉमर्सच्या शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून जीएसटी आणि इतर विषयांवर चार्टड अकाउंटंट मार्गदर्शन करणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रफुल छाजेड यांनी दिली. चार्टर्ड अकाऊंटंट यांची जीएसटीमध्ये विशेष भूमिका राहणार आहे. जीएसटी म्हणजे काय यासाठी काय करावे लागते, विविध परिषदा, कार्यशाळा घेऊन व्यापारी आणि असंघटित क्षेत्रातील लोकांना हे सांगणे सीएंची जबाबदारी आहे. यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. याशिवाय विविध मान्यवरांनी त्यांच्या विविध विषयांवर मनोगत व्यक्त करत जीएसटी विषयी तांत्रिक माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.