महसूलमंत्री चंद्रकातदादा पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव शहर पाणी पुरवठा योजनेचा (अमृत योजना) भूमीपुजन सोहळा
जळगाव ;- – शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना सुखी, आनंदी समाधानी करण्याचे काम होत आहे. जैन इरिगेशन जळगावच्या या अमृत योजनेचे काम 24 महिने नव्हे तर 23 महिन्यातच पूर्ण करेल असा विश्वास जिल्ह्याचे पालक मंत्री तथा तथा महसुलमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी व्यक्त केला. शहरातील भाऊंचे उद्यान येथे पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते 30 मार्च रोजी दुपारी औपचारिक भूमिपूजन करण्यात आले.
केंद्र शासन पुरस्कृत २४९.१६ कोटी रुपयांची अमृत अभियानांतर्गत जळगाव शहर पाणी पुरवठा योजनेचा (अमृत योजना) भूमीपुजन सोहळ्यास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला पाटील, विधानसभा सदस्य माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, खासदार ए. टी. पाटील, खासदार रक्षा खडसे, माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आ. चंदुलाल पटेल, आ. डॉ. सतीश पाटील, आ. हरिभाऊ जावळे, आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. शिरीष चौधरी, आ. उन्मेश पाटील, आ. किशोर पाटील, गुरुमुख जगवानी, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती प्रतिभा कापसे, स्थायी समिती सभापती ज्योती इंगळे, सभागृह नेता नितीन लढ्ढा, विरोधीपक्ष नेता वामनराव खडके यांच्यासह महापालिकेतील सर्व सन्मानिय नगरसेवक उपस्थित होते.
जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जळगावचा व माझा जुना ऋणानुबंध आहे. माझी ओळख करून देताना मी जळगावचा आहे अशीच ओळख करून दिली जाते. मा. भवरलालजी जैन यांनी या शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद केले. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी तोच वारसा पुढे चालविला जात असल्याचा आवर्जून उल्लेख केला.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जळगाव शहरातील अमृत योजनेचे वैशिष्ट्ये आपल्या प्रास्ताविकात सांगितले. त्यात ते म्हणाले की, जळगाव शहराच्या पाणी पुरवठा योजनेस केंद्र शासनाच्या अमृत अभियाना अंतर्गत राज्य शासनाने दि. 23 जून 2016 ला मंजूरी दिलेली आहे. या योजनेची एकुण अंदाजित रक्कम रू. 249.16 कोटी आहे. सदरच्या योजनेत पाण्याच्या उंच टाकीस जोडणारी जलवाहिनी (1200 मी. मी. ते 250 मी. मी.) 22.00 कि.मी. लांबी, पाण्याच्या उंच टाकी संख्या 07, वितरण वाहीन्या 644 कि. मी. सोलर पॉवर प्लॅन्ट 0.5 मेगा वॉट संच व पंप हाऊस संख्या 02, संगणकीय पर्यवेक्षण प्रणाली या कामांचा समावेश आहे. अमृत अभियाना अंतर्गत प्रस्तावित योजनेत मनपा हद्दीतील वितरण वाहीन्यांचे जलदाब संकल्पनानुसार स्वतंत्र झोन तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरीकांना पाण्याचे समान व योग्य दाबाने वितरण होणार आहे. वितरण व्यवस्थेच्या संकल्पनेनुसार 24 x 7 पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.
याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. शासनाच्या पाणी पुरवठा विषयक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या योजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. जळगाव महानगर पालिका उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी आभार मानले.