जैन इरिगेशन व फार्मफ्रेश फुडस लि.च्या एकत्रित वार्षिक उत्पन्नात १० टक्के वाढ

0

जळगाव | प्रतिनिधी

पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि दुष्काळी परिस्थिती असताना जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व सहयोगी कंपन्यांनी वार्षिक आर्थिक निकालात देशांतर्गत व्यवसायापेक्षा देशाबाहेरील व्यवसायात चांगली कामगिरी केली आहे. त्या बळावर कंपन्यांच्या एकत्रित वार्षिक उत्पन्नामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे केंद्रात नव्या सरकारने कारभार हाती घेतला आहे, या सरकारचे कृषी विषयक धोरण सकारात्मक असल्याने आणि येत्या काही दिवसात सुरू होणारा पावसाळा चांगला राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती चांगली राहील, त्यामुळे निश्चितच कंपन्यांच्या प्रगतीचा आलेख अधिक उंचावणार आहे. कंपनीच्या हाती जागतिकस्तरावरील ५ हजार कोटी रुपयांच्या ऑर्डर्सची नोंदणी झाली असल्याचे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व जैन फार्मफ्रेश फुडस लि.च्या भारतातील व परदेशातील कंपन्यांचे ३१ मार्च २०१९ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षण केलेल्या आर्थिक निकालात जाहीर करण्यात आले.

भारतातील सर्वात मोठी सुक्ष्म सिंचन आणि जागतिक पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाची सुक्ष्म सिंचन कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व जगातील आंबा प्रक्रिया उद्योगात प्रथम क्रमांकाची कंपनी जैन फार्मफ्रेश फुडस लि. यांनी एकत्रित जाहीर केलेल्या आर्थिक निकालांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे.

जैन इरिगेशन सिस्टिम्स व समुहातील कंपन्यांच्या एकत्रित उत्पन्नात ९.८३ टक्क्याने वाढ होऊन ते ८८४८.३ कोटी रुपये झाले.

  •  ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपन्यांचे लेखापरिक्षित आर्थिक परिणाम जाहीर करताना आनंद होतो आहे. कंपन्यांनी एकत्रित वार्षिक उत्पन्नात १० टक्के वाढ नोंदवली आहे आणि नफ्याचे मार्जीन कायम राखले आहे. देशांतर्गत व्यवसायाच्या तुलनेत देशाबाहेरील व्यवसाय हा जास्त वाढ दर्शवणारा होता. चौथ्या तिमाहीत भारताच्या ग्रामीण भागात दुष्काळ होता आणि कठीण तरलता परिस्थितीमुळे सुक्ष्म सिंचन प्रणालींच्या विक्रीतील वाढीवर परिणाम झाला. तसेच काही प्रकल्पातील पुरवठा लांबणीवर पडल्यामुळे प्लास्टिकचा व्यवसाय कमी झालेला दिसतो. आमची उपकंपनी जैन फार्मफ्रेश फुडसने अपेक्षेनुसार चांगली वाढ नोंदवली आहे. येणारा पावसाळा चांगला होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे आणि नवीन सरकारचे कृषी विषयक धोरण देखील सकारात्मक असल्याने कंपनी अपेक्षित असलेल्या प्रगतीकडे वाटचाल करणार आहे.

–    अनिल जैन, उपाध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव.  

Leave A Reply

Your email address will not be published.