जैन इरिगेशनला ‘मेक इन इंडिया फाऊंडेशन’चा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट ॲवार्ड’

0
जळगाव :- जैन इरिगेशन सिस्टिम्स्‌ लिमिटेड या भारतातील अग्रगण्य सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील कंपनीला ‘मेक इन इंडिया फाऊंडेशन’चा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट ॲवार्ड’ने गौरव करण्यात आला. जैन इरिगेशनच्या 40 वर्षांपेक्षा ठिबक, सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील जास्त कार्याचा व नाविन्यपूर्ण उत्पादने आणि प्रकल्प उभारण्याच्या उत्तम कामगिरीचा हा एक गौरवच आहे. हा पुरस्कार मुंबई प्रेस क्लबच्या सभागृहात जलसंधारण तथा राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते नुकताच देण्यात आला. कंपनीच्यावतीने हा पुरस्कार कंपनीचे वरीष्ठ अधिकारी एस.पी. जाधव यांनी स्वीकारला.
मेक इन इंडिया फाऊंडेशन एक नवीन विचारांची संस्था आहे व तिची स्थापना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या आणि ध्येयाची प्रेरणा घेऊन झाली आहे. जैन इरिगेशनच्या सिंचन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण अशा एकात्मिक प्रणाली उपाययोजना, शेतकऱ्यांसाठी एका छताखाली विविध उत्पादनांची मालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेली अमोल कामगिरी कंपनीने केलेली आहे. या गोष्टीला अधोरेखित करून  पुरस्कारासाठी जैन इरिगेशनची निवड झाली आहे. अनेक कंपन्यांनी देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन मेक इन इंडिया फाऊंडेशनने त्यांना उत्तम कामगिरीसाठी पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले आहे. यामुळे ज्या कंपनीचा देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे अशा कंपन्यांना हे पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.
Leave A Reply

Your email address will not be published.