चित्तूर ;– आंध्रप्रदेश सरकारच्या श्रम विभागातर्फे कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील सुसंवाद चांगला राहण्यासाठी आणि सामाजीक जबाबदारीची जाणीव ठेवण्यासाठी कामगार दिनानिमित्त ‘बेस्ट मॅनेजमेंट अॅवॉर्ड’ हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी जैन इरिगेशनच्या चित्तुर प्रकल्पाला या पुरस्काराने आंध्रप्रदेश सरकारतर्फे गौरविले गेले. विजयवाडा येथे काल 1 मे रोजी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याहस्ते कंपनीच्यावतीने हा पुरस्कार वरिष्ठ अधिकारी समीर शर्मा यांनी स्वीकारला. याप्रसंगी श्रम आणि कामगार मंत्री पी.सत्यनारायणा, सिंचन मंत्री डी. उमामाहेश्वर राव आणि त्यांच्या विभागाचे सचिव आणि आयुक्त उपस्थीत होते.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन ‘आपण आपल्या कामाचे मालक आहात त्यामुळे कंपनीत काम करताना मालकाप्रमाणे सहकाऱ्यांनी वागले पाहिजे.’ असे संस्कार येथे रुजविले आहेत. जैन इरिगेशनमध्ये काम करणारा कामगार नसून तो सहकारी आहे. या आदर्श कार्यसंस्कृतीतूनच जैन इरिगेशनची वाटचाल सुरू आहे. कंपनीचा चित्तूर येथेही अन्न प्रक्रिया प्रकल्पात याचा अवलंब होतो. सहकारी आणि व्यवस्थापन यांच्यातील सुसंवाद, सौहर्दापूर्ण वातावरण आहे. कंपनीने सामाजिक उत्तर दायित्व स्वीकारून (सीएसआर) या भागात विविधानेक जनकल्याणाचे प्रकल्प राबविले जात आहेत. सहकारी व व्यवस्थापन यांच्या उत्तम सुसंसवादामुळे औद्योगिक शांततेसोबत चित्तुर प्रकल्पाने आंध्रप्रदेशमध्ये वेगळा ठसा उमटविला. ही बाब आंध्रप्रदेश सरकारने हेरून चित्तुर प्रकल्पाला ‘बेस्ट मॅनेजमेंट अॅवॉर्ड’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.