Monday, January 30, 2023

जेष्ठ नागरिक चार महिन्यांपासून अनुदानाच्या प्रतिक्षेत

- Advertisement -

 यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल तालुक्यातील जेष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विविध निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मागील चार ते  पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

यावल तालुक्यात निराधार अनुदान धारकांची संख्या बरीच आहे. तसेच जेष्ठ नागरीक, श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना, अपंग, दिव्यांग असे अनेक लाभार्थी गेल्या चार महिन्यापासून अनुदानापासुन वंचित आहे. तसेच त्यांचा उदनिर्वाह याच योजनेच्या  लाभावर अवलंबुन असल्याने त्यांच्यावर उपासमारीचे वेळ आली दिसत आहे.

- Advertisement -

गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून  १ रुपया सुद्धा  लाभार्थांना आपाल्या खात्यामध्ये मिळालेला नाही. यामुळे लाभार्थीची आर्थिक परिस्थिती बिकट  झाली आहे. सध्या कोरोनाने हैरान झालेले लाभार्थी  आता लाभापासून वंचित आहे. नवीन संजय गांधी समिती स्थापन झाली असून  यावल तालुक्यात संजय गांधी समितीचे नवनिर्वाचित  अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांनी या गंभीर समस्येकडे जातीय लक्ष देऊन लवकरात लवकर पाठ पुरावा करून लाभार्थांना त्यांची मदत  त्याच्या खात्यात जमा करावी व लाभार्थांचा प्रश्न मिटवावा अशी मागणी संजय गांधी योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थांकडून यावल तालुक्यात होत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे