जेईई आणि नीटच्या परिक्षा पुढे ढकलण्यात याव्या या मागणीसाठी सानंदांच्या नेतृत्वात खामगांवात काॅंग्रेसचे धरणे आंदोलन

0

खामगांव (प्रतिनिधी)  : देशात कोरोना महामारीचे भिषण संकट समोर आले असुन दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. अश्या भयंकर परिस्थितीमध्ये विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या जिवीताची पर्वा न करता केंद्रातील मोदी सरकारने जेईई आणि नीट च्या परिक्षा घेण्याचे ठरविले आहे.विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ आहे. शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. परिक्षेमुळे कोरोनाचा समुह संसर्गाचा धोका निर्माण होउ शकतो. म्हणून हया परिक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी अनेक राज्यासह विद्याथ्र्यांनी केंद्र सरकारकडे केली. तरीही केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात जेईई आणि नीटच्या परिक्षा घेण्याचे ठरविले आहे. केंद्रातील मोदी सरकारला विद्याथ्र्याच्या जीवीताची पर्वा नाही. नरेंद्र मोदी विद्यार्थी विरोधी आहे असा आरोप माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केला आहे.

दि.31 आॅगस्ट 2020 रोजी अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीने आदेशित केल्यानुसार जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा जिल्हयातील प्रत्येक तहसिलवर जेईई आणि नीट च्या परिक्षा पुढे ढकलण्यात याव्या या मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. खामगांव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार, महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.सुरजितकौर सलुजा, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,माजी नगरसेविका सौ.अर्चनाताई डुकरे, नगरसेवक किशोरआप्पा भोसले, नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, पं.स.सदस्य विठठ्ल सोनटक्के, पं.स.सदस्य इनायत उल्ला खाॅं, युवक काॅंग्रेसचे जिल्हा महासचिव तुषार चंदेल, खामगांव विधानसभा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मंगेश इंगळे, एनएसयुआयचे शहर अध्यक्ष रोहित राजपुत, आकाश जैस्वाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना सानंदा म्हणाले की, देशभरातुन जवळपास 27 लाख विद्याथ्र्यांनी जेईई आणि नीटच्या परिक्षासाठी फाॅर्म भरलेले आहे. भारतात कोरोना संक्रमण झपाटयाने वाढत असुन संक्रमणामध्ये भारत जगात तिस-या क्रमांकावर आहे. कोरोना महामारीमुळे देशातील 58 हजार पेक्षा जास्त नागरीक मृत्यूमुखी पडलेले आहेे. देशातील अनेक राज्यात रेल्वे,बस सेवा पुर्णपणे सुरु झालेल्या नाही,काही राज्यात पुरपरिस्थितीमुळे लाखो लोक प्रभावीत झाले आहे, दळवळणाच्या साधनांवर मर्यादा असतांना परिक्षा केंद्रापर्यंत पोहोचायचं कसं असा प्रश्न लाखो विद्याथ्र्यांसमोर आहे.विद्याथ्र्यांना परिक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. या परिक्षावरुन विद्यार्थी व विद्याथ्र्यांच्या आई-वडीलांची चिंता वाढली असून परिक्षांची तारीख पुढे वाढवुन देण्यात यावी व कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच परिक्षा घेण्यात यावी अशी मागणी आहे. काॅंग्रेस नेते राहुलजी गांधी,मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक राज्यांनी या परिक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी केंद्राकडे विनंती केली. तरी केंद्र सरकारने आडमुठ पणाचे धोरण स्वीकारुन सप्टेंबर महिन्यात परिक्षा घेण्याचे जाहिर केले आहे. विद्याथ्र्यांची मानसिक स्थिती,कोरोनाचे संकट वाढण्याची भिती, दळणवळणावर आलेल्या मर्यादा, परिक्षेमुळे कोरोना संकटाचा मुकाबला करणा-या शासकीय यंत्रणेवर पडणारा अतिरिक्त ताण या सर्व बाबींचा विचार करुन सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणारी जेईई व नीटची परिक्षा आणि काही महिन्यांसाठी पुढे ढकलुन कोरोनाची परिस्थिती  सामान्य झाल्यानंतर परिक्षा घेण्यात याव्या असे सानंदा यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या अडेलतटटु धोरण स्वीकारुन परिक्षा घेतल्यास व त्यामुळे विद्याथ्र्यांच्या जिवीताचे बरे वाईट झाल्यास त्यास मोदी सरकार जबाबदार राहिल असा इशारा सानंदा यांनी दिला आहे.

तद्नंतर उपविभागीय अधिकारी खामगांव यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेईइ्र्र आणि नीट परिक्षा पुढे ढकलण्यात याव्या या मागणी संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.यावेळी मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काॅंग्रेसच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर हाताला काळया फिती लावुन तीव्र निदर्शने करुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये  काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. नरेंद्र मोदी विद्यार्थी विरोधी, भाजप सरकार हाय-हाय, राहुलजी गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय राष्टीय काॅंग्रेस पक्षाचा विजय असो अश्या गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनामध्ये माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर,माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे,माजी जि.प.सभापती सुरेशभाऊ वनारे,पं.स.चे माजी उपसभापती चैतन्य पाटील, स्वप्नील संजय ठाकरे, पंजाबरावदादा देशमुख मो.वसीमोदद्ीन,शेख जुल्कर शेख चाॅंद,बाजार समितीचे संचालक श्रीकृष्ण टिकार, निलेश देशमुख, प्रितम माळवंदे,धनंजय वानखडे,अमित भाकरे,विजय निखाडे,राहुल मच्छरे,सागर मुयांडे पाटील,उत्तम माने, नारायण गायकवाड,कृष्णा गवळी,अनिकेत बोंबटकार, शुभम मिश्रा,जुनैद मुल्लाजी,अनिल गायकी,श्रीकृष्ण गायकी,एजाज देशमुख, शेख रशीद, जसवंतसिंग शिख,मो.नईम, जितु राजपुत,शहजाद उल्ला खाॅं,जयराम मुंडाले, अवधुत टिकार, माजी नगरसेवक परवेजखान पठान यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.