भुसंपादन निधी प्रत्यक्ष वनविभागाकडे वर्ग करा, नदीजोड प्रकल्पासह इतर मागण्यांना प्रशासकीय मान्यता द्या
जळगांव, दि.20-
भडगांव तालुक्यातील जुवार्डी येथील पाझर तलावाच्या कामात 13 हेक्टर वनविभागाच्या बाधीत जमिनीचा भूसंपादन निधी 81 लाख 38 हजार प्रत्यक्ष वनविभागाकडे वर्ग केल्याशिवाय व आडळसे-जुवार्डी-पथराड नदीजोडचा पोहोच कालवा, बहाळ-जुवार्डी कालवा आदी अपूर्ण सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देउन त्यासाठी लागणार्या निधीसाठी ठोस निर्णय झाला तरच उपोषण मागे घेण्यावर ग्रामस्थ निर्णय अंतिम आहे.
काशिनाथ पाटील, रमेश पाटील, हेमराज पाटील, रवींद्र्र पाटील, तात्या पाटील, जगन पाटील, सखाराम पाटील, विजय साळुंखे, प्रकाश पाटील व रवींद्र चिंधू पाटील आदी 10 ग्रामस्थ जुवाडी ये
येथे ग्रामंपचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
मंगळवारी 20 रोजी उपोषणस्थळावर तहसीलदार वाघ यांनी ग्रामस्थांना जळगाव येथे जावून चर्चा करण्याची विनंती केली असता उपोषणकत्यार्ं ग्रामस्थांनी ती फेटाळून लावली. भडगांव पचायत समिती सभापती रामकृष्ण पाटील, पाचोरा कृउबाचे अॅड.विश्वास भोसले, डॉ.उत्तमराव महाजन, अमोल शिंदे, संजय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विलास पाटील, जिल्हा दूध संघाचे प्रमोद पाटील, जे.के.पाटील यांनी, तर बुधवारी पाचोरा भडगांव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ, तालुक्यातील भारतीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदीप पवार, जि.प.चे माजी सभापती विकास पाटील, बापूराव पाटील आदींनी उपोषणस्थळी भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. उपोषणासंर्दभात जिल्हाधिकारी यांनी दि.20 रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांना तातडीने पत्र देत वनविभागाला द्यावयाच्या भूसंपादन निधीबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले असल्याचे म्हटले आहे.