Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जुन्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून ; एकाला अटक 
    उत्तर महाराष्ट्र

    जुन्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून ; एकाला अटक 

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 3, 2025Updated:October 3, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जुन्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून ; एकाला अटक 

    जळगाव शहरातील कासमवाडी परिसरातील घटना 

    जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्कI  शहरातील कासमवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास जुन्या वैमनस्यातून घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. दोन तरुणांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका जाधव (वय २७, रा. कासमवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून एका संशयिताला ताब्यात घेतले असून, दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

    नाना जाधव याचा परिसरातील काही तरुणांशी पूर्वीपासून वाद होता. दसऱ्याच्या रात्री तो एकता मित्र मंडळाजवळ उभा असताना, दोन हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. जुन्या रागातून त्यांनी धारदार शस्त्राने नानाच्या पोटात आणि मांडीवर अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या नानाला मित्रांनी तातडीने दुचाकीवरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. अतीदक्षता विभागात उपचार सुरू असताना, गंभीर जखमांमुळे अवघ्या तासाभरात त्याचा मृत्यू झाला.

    घटनेनंतर तणाव
    मृत्यूची बातमी समजताच नातेवाइकांनी रुग्णालयात आक्रोश केला. परिसरात मोठी गर्दी जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड आणि पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या पथकाने तातडीने रुग्णालय गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला.

    स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती देत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. या घटनेमुळे कासमवाडी परिसरात भीतीचे वातावरण आहे.

    #murder jalgaon Kasam Wadi MIDC Police Station
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif