जळगाव ;- शासनाच्या सेवेत 31 ऑक्टोबर 2005 नंतर लागलेल्या महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता व शिक्षण विभागात शासनाने वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठीच्या जाचक अटी असलेला अन्यायकार शासन निर्णय रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे शनिवार 7 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी जिल्हाध्यक्ष गोविंदा ठाकरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले .
या आहेत मागण्या
शिक्षकांना पदोन्नतीची संधी तर मिळत नाही उलट 12 व 24 वर्षांनंतर मिळणाऱ्या वरिष्ठ वेतन श्रेणीत सुद्धा जाचक अटी लादून शिक्षकांवर केलेला हा अन्याय आहे .तसेच अंशदाई पेन्शन योजनेनुसार मयत कर्माचारी बांधवाना पेन्शन तर नाही पण त्यांना कपात झालेली हक्काची रक्कम सुद्धा शासनाकडून मिळत नाही हा सुद्धा एक मोठा अन्याय आहे म्हणून त्याविरुद्ध लढा उगारने ही काळाची गरज असून त्याची मुहूर्तमेढ घंटेच्या नादाने शनिवारी रोवली जात असल्याचे जिल्हाध्यक्ष गोविंदा ठाकरे पाटील यांनी सांगितले .
आंदोलनासाठी राज्य उपाध्यक्ष संदीप पवार , जिल्हा सल्लागार नाना पाटील , जिल्हा कोषाध्यक्ष राकेश पाटील, जिल्हा संघटक विपीन पाटील
शिक्षक संघटनेचे जळगाव तालुका अध्यक्ष.गोविंदा लोखंडे , सचिव .अजित चौधरी , प्रसिद्धी प्रमुख.योगेश भालेराव , .निलेश मोरे , महेश तायडे , निखिल जोगी , आदी उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.