जुना मलकापूर रोडवरील कईटी नाल्यावरील पूल तातडीने पूर्ण करा – आ. चंद्रकांत पाटील

0

मुक्ताईनगर | प्रतिनिधी 

येथील शेतकऱ्यांचा तसेच कुंड गावाचा मुख्य रस्ता असलेल्या जुना मलकापूर रोडवर पूर्णा नदी बॅक वाटर मुळे रहदारीस अडचण येते म्हणून येथील कईटी नाल्यावर भव्य अशा पुलाचे बांधकाम व या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे . हे अतिशय निकृष्ट दर्जाचे व शेतकऱ्यांना प्रचंड अडचणी उभ्या करणारे होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन भेट देत पाहणी केली.व येथील गंभीर प्रकार लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम मंडळ विभागाचे अधीक्षक अभियंता पी.पी.सोनवणे तसेच मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वाय.बी.शेख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. व शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच कामाला गती देऊन सदरील रस्ता व पूल शेतकऱ्यांच्या राहादरीस मोकळा करण्याची सूचना केली . प्रसंगी माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे , शहर संघटक वसंत भलभले यांच्यासह अशोक पाटील , जनार्दन शेवाळे , दत्तू माळी , धनराज जुमळे, रुपेश पाटील , ज्ञानेश्वर ठोके , बाळू काळे, रमेश महाजन , बाळू ठोके , अशोक जुमळे, पुंडलिक पाटील आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

” जुना मलकापूर रस्त्यावरील कईटीच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे . सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या पूर्णा नदी पात्रात हतनूर धरणाचे पाण्याची पातळी वाढण्याच्या संभाव्य प्रकारासाठी या भागातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नदीपात्रात  पर्यायी पूल व रस्ता  तयार करण्यासाठी अर्ज केले .व तक्रारी देखील केल्या मात्र संबंधितांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले . व ठेकेदाराने तात्पुरते छोटे पाईप टाकून रहदारी सुरू केल्याचा दिखावा केला मात्र आता पूर्णा नदी पात्राची पाण्याची उंची वाढल्याने तो तात्पुरता रस्ता पूर्णपणे पाण्यात बुडला आहे . यामुळे शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी शेतात जाणे जिकरीचे झाले आहे .त्यातच काल एका शेतकऱ्याची रिक्षाची मोठी दुर्घटना येथे घडली .सुदैवाने तिघांचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले अन्यथा तिघेही या दुर्घटनेत ठार झाले असते . तसेच याला पुलाच्या मुख्य रस्त्याचे गेल्या दोन महिन्यापूर्वीच डांबरीकरणाचे काम काही प्रमाणात करण्यात आले मात्र या रस्त्याला पाणी निचरा होण्याच्या चारी न केल्यामुळे हे पाणी रस्त्यावर साचत असल्याने अवघ्या दोन महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्याचे तीन तेरा वाजले असून रस्ता पूर्णपणे उखडत आहे .याप्रकरणी शेतकऱ्यांनी आमदार पाटील यांच्याकडे तक्रार केली असता आमदार पाटील यांनी तात्काळ दखल घेत या ठिकाणी जाऊन पाहणी केली .व संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्यात.

येथील शेतकऱ्यांचा तसेच कुंड गावाचा मुख्य रस्ता असलेल्या जुना मलकापूर रोडवर पूर्णा नदी बॅक वाटर मुळे रहदारीस अडचण येते म्हणून येथील कईटी नाल्यावर भव्य अशा पुलाचे बांधकाम व या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे . हे अतिशय निकृष्ट दर्जाचे व शेतकऱ्यांना प्रचंड अडचणी उभ्या करणारे होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन भेट देत पाहणी केली.व येथील गंभीर प्रकार लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम मंडळ विभागाचे अधीक्षक अभियंता पी.पी.सोनवणे तसेच मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वाय.बी.शेख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. व शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच कामाला गती देऊन सदरील रस्ता व पूल शेतकऱ्यांच्या राहादरीस मोकळा करण्याची सूचना केली .

प्रसंगी माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे , शहर संघटक वसंत भलभले यांच्यासह अशोक पाटील , जनार्दन शेवाळे , दत्तू माळी , धनराज जुमळे, रुपेश पाटील , ज्ञानेश्वर ठोके , बाळू काळे, रमेश महाजन , बाळू ठोके , अशोक जुमळे, पुंडलिक पाटील आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

” जुना मलकापूर रस्त्यावरील कईटीच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे . सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या पूर्णा नदी पात्रात हतनूर धरणाचे पाण्याची पातळी वाढण्याच्या संभाव्य प्रकारासाठी या भागातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नदीपात्रात  पर्यायी पूल व रस्ता  तयार करण्यासाठी अर्ज केले .व तक्रारी देखील केल्या मात्र संबंधितांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले . व ठेकेदाराने तात्पुरते छोटे पाईप टाकून रहदारी सुरू केल्याचा दिखावा केला मात्र आता पूर्णा नदी पात्राची पाण्याची उंची वाढल्याने तो तात्पुरता रस्ता पूर्णपणे पाण्यात बुडला आहे . यामुळे शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी शेतात जाणे जिकरीचे झाले आहे .त्यातच काल एका शेतकऱ्याची रिक्षाची मोठी दुर्घटना येथे घडली .सुदैवाने तिघांचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले अन्यथा तिघेही या दुर्घटनेत ठार झाले असते . तसेच याला पुलाच्या मुख्य रस्त्याचे गेल्या दोन महिन्यापूर्वीच डांबरीकरणाचे काम काही प्रमाणात करण्यात आले मात्र या रस्त्याला पाणी निचरा होण्याच्या चारी न केल्यामुळे हे पाणी रस्त्यावर साचत असल्याने अवघ्या दोन महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्याचे तीन तेरा वाजले असून रस्ता पूर्णपणे उखडत आहे .याप्रकरणी शेतकऱ्यांनी आमदार पाटील यांच्याकडे तक्रार केली असता आमदार पाटील यांनी तात्काळ दखल घेत या ठिकाणी जाऊन पाहणी केली .व संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.