Wednesday, August 17, 2022

जुगार अड्यावर छापा; ११ जणांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

चाळीसगाव  शहरातील कांदा मार्केटजवळ जुगाराचा अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळताच सदर ठिकाणी छापा टाकून साडे सात हजार रुपये रोकड हस्तगत करून अकरा जणाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

चाळीसगाव शहरातील कांदा मार्केटच्या जवळील भिंतीलगत पत्यांचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांना मिळाली. त्यावर शहर पोलिसांनी सदर ठिकाण गाठून १५ आक्टोंबर रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास छापा टाकला असता. एकूण ७४६० रुपये रोकड जप्त करून अकरा जणाविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या कारवाईत अनिल रामराव देशमुख (वय ५१, रा.पाटणादेवी रोड), रविन्द्र वीरभान पाटील (वय ४४, रा. वाघडू), मेहमुद्खान रसुलखान (वय ६०, रा. ख्वाजा चौक), उमेश संतोष हाडपे (वय ३१, रा. पाटणादेवी रोड), अनिल शिवाजी पवार (वय २५, रा. नागद रोड), पवन सरदारसिंग राजपूत (वय २३, रा. घाटरोड), राजू किसान भोई (वय ४९, रा. बाजारपेठ), शामकांत देविदास आगोने (वय ३५, रा. पाटणादेवी रोड), सुनील परसुराम मोची (वय ५६, रा. इंधीरानगर), राजेंद्र उर्फ किसन तान्हाजी देशमुख (वय ५८, रा. रिंगरोड) व राजेंद्र शिवाजी कोळी (वय५०, रा. पाटणादेवी) आदींचा समावेश आहे.

सदर  कारवाही पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन कापडणीस, सपोनि सागर ढिकले, पोउनि अमोल पवार, पोना विनोद भोई, पोना सैलेश पाटील, पोना राकेश पाटील, पोना संदीप पाटील, प्रकाश पाटील व विनोद खैरनार आदींनी केली. विनोद खैरनार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अकरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशनानुसार पुढील तपास विनोद भोई हे करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या