जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा ; 6 इसमांसह मोटरसायकली जप्त

0

पोलीस काॅन्सटेबल जखमी

धरणगाव (प्रतिनिधी) : येथील पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शामखेड शिवारात एका जुगार अड्ड्यावर मध्यरात्री १२वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ६जणांना जागीच पकडले.यात एक पोलीस काॅन्सटेबल जखमी झाले.

सविस्तर वृत्त असे की, दि २४ रोजी मध्यरात्री स पो निरीक्षक पवन .पी . देसले यांना गोपनीय माहिती मिळाली की, शामखेड शिवारात धरणगांव फाट्या जवळ काही इसम स्वताच्या फायद्यासाठी पत्ता जुगाराचा खेळ खेळीत आहे अशी खबर मिळताच लगेच स .पो .निरीक्षक पवन देसलेसह पोलीस टीम घेऊन सरकारी वाहनाने बातमी मिळालेल्या ठिकाणावर पोहचले सदर ठिकाणी सहा इसम गोलाकार बसून पत्यांचा खेळ खेळतांना आढळले.

पोलीसांनी तात्काळ त्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री १२वाजेच्या सुमारास छापा टाकून सहाही इसमांना जागीच पकडले . दरम्यान रेड टाकीत असताना सपोनिरी पवन देसले , पोकाॅ. पकंज पाटील , पोकाॅ कैलास पाटील , असे धावपळीत जखमी झाले आहेत.

सदर जुगार खेळणारे इसमांनी त्यांच्या हातातील पत्ते खेळात जमिनीवर टाकून दिले व पळ काढला ताब्यात घेतलेल्या ६ जणांकडे रोख २४०५/ रुपये व मोटरसायकलींसह पत्ता जुगाराचे साधने मिळून १,१२,४०५/रूपये किंमतीचा माल जप्त केला.

अंगझडतीत काही वस्तू घटनास्थळावर मिळून आलेल्या पत्ता जुगाराच्या गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करुन ताब्यात घेतल्या आहेत गुन्हा दाखल करुन पूढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.