Thursday, September 29, 2022

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ६ जणांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील शिवाजी उद्यानात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या पथकाने सहा जणांच्या विरूध्द कारवाई केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शिवाजी उद्यानात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे इम्रान बेग, अल्ताफ पठाण, पोलिस उपविभागीय कार्यालयातील रवींद्र मोतीराया, पोलिस नाईक महेश महाले, मुख्यालयातील नवनाथ निकम, रवींद्र सुरळकर, शहादेव कनसे, कडूबा म्हस्के, पवन संदर्डे, कल्पेश गायकवाड, चंद्रकांत चिकटे, तथागत सपकाळे यांच्या पथकाने छापा मारला.

यावेळी जुगार खेळताना मिळून आलेल्या स्वप्निल अशोक पाटील (वय २८, रा. वाघनगर), गणेश चंद्रकांत आठवले (वय ४०, रा. चौघुले प्लॉट), ललित गणेश चौधरी (वय २६, रा. ईश्वर कॉलनी), रवींद्र नकुल कोळी (वय ३२, रा. रायपूर कुसुंबा), राजेंद्र श्यामराव पाटील (वय ४२, रा. सुप्रीम कॉलनी), सतीश प्रभाकर वाघुळदे (वय ४४, रा. रामानंदनगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या