Thursday, September 29, 2022

जुगार अड्ड्यावर छापा; १० जणांना अटक

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

शहरातील खंडेराव नगरमध्ये कल्याण मटका जुगारावर काल रात्री टाकण्यात आलेल्या छाप्यात दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

योगेश दौलत महाजन (वय 36), संतोष विटट्ल भोई (वय 38) , मुकेश चरणदास राठोड (वय 30), अशोक रामदास सोनार (वय 63), शंकर वेडु भोई, शिवा राजधर मिस्तरी (वय 45), गणेश गुरुमुख पवार (वय 35), रमेश पुंडलिक जगताप (वय 53) रा. हरीविठ्ठनगर जळगाव, धनराज सिताराम पाटील (वय 67, रा.खंडेराव नगर शिंपीगल्ली जळगाव), रविंद्र अमृत बोरसे (वय 42. रा, हरीविठ्ठनगर स्टॉपजवळ जळगाव) या दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

कैलास बुधा हटकर रा. हरीविठ्ठलगर यांच्या सांगण्यावरुन हा जुगार सुरु असल्याचे ताब्यातील सर्वांनी सांगितले. कैलास हटकर सध्या फरार आहे. अटकेतील सर्वांकडून सट्टा जुगाराचे साहित्य आणि 4730 रुपये हस्तगत करण्यात आले आहे.

पो.कॉ.अजय सपकाळे यांच्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.शिंदे यांच्यासह स.पो.नि. संदीप परदेशी, उप निरीक्षक देशमुख, प्रवीण जगदाळे, पो.कॉ. अजय सपकाळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

 

 

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या