जळगाव – निसर्गाने आपणास खूप चांगले आयुष्य व आरोग्य दिले आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेवून जीवनात नेहमी आनंदात राहावे. ज्या-ज्या ठिकाणी ज्ञान मिळेल तेथून ते घ्यावे. यासाठी वयाची मर्यादा नसेल तेव्हाच आपण यशस्वी होऊ, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांनी केले. ते एचआयव्ही सह जगणारे पालक व त्यांच्या मुलांसाठीच्या कार्यक्रमात कांताई सभागृहात बोलत होते.
व्यासपीठावर फारुख शेख, करिम सालार, सुधिर वाघुळदे, अरविंद देशपांडे, विजय मोहरील, रविंद्र धर्माधिकारी, मनिषा बागुल, आशा चौधरी, पुनम पाटील, संगिता पाटील उपस्थित होते. भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दरमहिन्याच्या 25 तारखेला एचआययू बाधित मुल-मुली व त्यांच्या पालकांना सकास आहार दिला जातो. तसेच त्यांच्यासोबत जेवण धेवून त्यांच्याशी हितपुज केली जाते. यासनिमित्त सोनवणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी एचआययू बाधितांना प्रेरणा देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा अनूभवाचा व अभ्यासाचा उपयोग करुन त्यांना आपल्यामधील बदल घडविण्यासाठी प्रेरित केले. जगातील दिव्यांग व एचआययू बाधित व्यक्तींची सचित्र माहिती दिली. ज्यांना हात-पाय नाही तरी ते जगातील यशस्वी लोकांमध्ये तर ईश्वराने आपणास सर्व काही दिले असून आपण निराश होता कामा नये. जिद्द परिश्रमाने जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. करिम सालार यांनी देखील मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन फारुख शेख यांनी केले.