इमारत पाडण्याची पालकांची मागणी : टवाळखोरांनी केली इमारतीची मोडतोड
* शाळा परिसरात घाणीचे साम्राज्य.
* संरक्षक भिंतीची गावक-यांची मागणी
भडगाव :- तालुक्यातील महिंदळे येथे जि.प.शाळेच्या पाच खोल्यांची सत्तर वर्ष जुनी ईमारत आहे. अगोदर कौलारू पध्दतीने हि इमारत होती .कालांतराने कौल काढून त्यावर पत्रा टाकण्यात आला. या इमारतीची दैनावस्था झाल्यामुळे सर्व शिक्षा अभियानातून येथे चार वर्ग खोल्या मंजूर झाल्या .व त्यांचे बांधकाम होऊन वर्ग त्या नविन इमारतीत गेल्या पाच वर्षापासून भरायला लागले. तरीही या जिर्ण व पडकी झालेली इमारत पाडण्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही .प्रशासन मोठा अपघात होण्याची वाट पहात आहे कि काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. जिर्ण ईमारत लवकर पाडावी अशी मागणी पालकांची व गावक-याची आहे. या जुन्या इमारतीचा पाया खालून पोकळ होत असल्यामुळे हि इमारत केंव्हाही कोसळू शकते. येथे मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विद्यार्थी मधल्या सुट्टीत या इमारतीत खेळतात किंवा सुटीच्या दिवशी तर येथे रिकामटेकड्याची वर्दळ असते. त्यामुळे येथे मोठा धोका होऊ शकतो.
शाळा परिसरात या पडक्या खोल्यांमध्ये व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरवण्याचे काम गावकरी करत आहेत. या पडक्या खोल्यांच्या भिंतीला तडे पडले आहेत. त्यातून साप , विंचू सारखे विषारी जनावरे येथे आढळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो.व घाणीच्या साम्राज्य असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शाळेला संरक्षक भिंत व्हावी अशी प्रदीर्घ मागणी आहे.जि.प.ची हि परिसरातील फार जुनी शाळा येथे पहीली ते सातवी पर्यंत वर्ग होते. त्यामुळे येथे परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी यायचे कालांतराने येथे पहीली ते चौथी पर्यंतच वर्ग राहीले जून्या काळी काटेरी कुंपण असायचे त्यामुळे इमारत सुस्थितीत होती. पण गेल्या अनेक वर्षापासून येथे कुपन नाही त्यामुळे शाळा उतरकरूचे माहेरघर झाली आहे. हि इमारत जणू गुरांचा गोठा झाली आहे.गावातील टवाळखोरांनी तर हद्दच केली आहे.येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरवतात व शाळेची मोडतोड करतात. पूर्ण खोल्यांचे खिडक्या ,दरवाजे,फर्ची,व जूने लाकडी साहीत्येही चोरीस गेले आहे. या जिर्ण इमारतीत टवाळखोरांचा जास्त वापर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते. त्यामुळे शाळेला संरक्षक भिंत व्हावी अशी वेळोवेळी पदाधिका-याकडे गावकरी मागणी करतात पण या मागणी कडे गेल्या सत्तर वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे.परिणामी शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे.
या जिर्ण व पडक्या ईमारतीकडे जि.प.प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास येथे मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे हि इमारत लवकर पाडावी व शाळेला संरक्षक भिंत व्हावी अशी मागणी गावक-यांनी केली आहे.