Wednesday, September 28, 2022

जीपचा टायर फुटून भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

- Advertisement -

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जीपचा टायर फुटल्याने अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात  झाला आहे.  हा अपघात इतका भीषण होता की अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातात 10 ते 15 प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताच्या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या क्रुझर जीपचा टायर फुटला. गाडीचा टायर फुटल्याने जीप पलटून  हा अपघात झाला आहे.

जीपचा टायर नेमका कशामुळे फुटला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बाबा मिस्त्री यांनी आरोप केला आहे की, एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जीपचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच जीप चालकही प्रवासी संख्येहून अधिक जणांना गाडीत बसवत प्रवास करत आहेत.

यामुळेच हा अपघात घडला आहे. अपघातानंतर रुग्णवाहिकाही त्वरित उपलब्ध झाली नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आम्ही जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असंही बाबा मिस्त्री यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या