जि . प. समोर क्षयरोग विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱयांचे उपोषण

0

मानधनात वाढ करण्याची मागणी ; सीईओना निवेदन

जळगाव;- सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (सुराक्षनिका) च्या कर्मचाºयांना सन २०१४ ते २०१८ पर्यंत मानधनवाढ व लोयल्टी बोनस देण्यात यावा या मागणीसाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम विभागाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी जिल्हा परिषदेसमोर २७ पासून उपोषण सुरु केले आहे. जि.प.सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांनी उपोषणात सहभाग घेतला .

जळगाव ग्रामीण मधील सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांना जि.प.आरोग्य विभागाने सन २०१४ ते २०१८ या दरम्यान मानधनवाढ व लोयल्टी बोनस दिलेला नाही. या संदर्भात सुराक्षनिका कंत्राटी कर्मचा-यांनी वारंवार मागणी केली. २३ मार्च २०१८ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीच्या सभेत जि.प.सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांनी हा विषय मांडला होता . मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने . त्यामुळे प्रा.डॉ.निलम पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कर्मचाºयांनी २७ मार्च पासून जिल्हापरिषदेसमोर उपोषणला प्रारंभ केला आहे.यावेळी निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाराची यांना देण्यात आले.

यांचा आहे उपोषणात सहभाग
दयानंद पाटील, किशोर सैंदाणे, नीलेश माळी, किशोर अहिरराव, प्रमोद पाटील, एन.सी.जंगले,ललित राणे, संदीप अहिरराव, भानुदास चौधरीदीपक मोरे, प्रदीप झांबरे, योगीराज पाटील, सुयोग महाजन, एन.व्ही.चौधरी,एस.बी.तायडे,आसिफ तडवी, एन.बी.राणे , मंगेश खैरनार, भगवान चौधरी, नीलेश भंगाळे, हर्षल पाठक, राहुल वाडिले, अकील पटेल,नरेंद्र सूर्यवंशी, , आदी

Leave A Reply

Your email address will not be published.