सांगवी ता पारोळा प्रतिनिधी
परिसरातील नामांकित जि.प उच्च प्राथमिक शाळा सांगवी ता पारोळा येथील विध्यार्थी ,शिक्षक पालक आणि समाज विविध शैक्षणिक उपक्रमात गुणवत्तापूर्ण परंपरा टिकवून आहे.
येथील शाळा डिजिटल असून नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र, राज्य सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आली आहेत येथील उपशिक्षिका स्मिता श्रीराम देसले यांना नुकताच कांग शिक्षण प्रसारक मंडळ फत्तेपुर ता जामनेर जि जळगाव येथील गुरुजनांनी स्थापन केलेल्या संस्थे मार्फत जामनेर येथील गटशिक्षणाधिकारी वाडकर व मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन सहकुटूंब सन्मान केला कांग परिसर मंडळाने संपूर्ण जिल्यातील गुणवंत शिक्षक शिक्षिका यांचा शोध घेऊन ज्ञानदानाचे काम करणार्या प्रामाणिक शिक्षाकांचा राष्ट्रनिर्माता आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
त्यात स्मिता देसले यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला स्मिता देसले यांनी 10 वर्ष आदिवासी बहुल क्षेत्रात काम करून खेड्यातील ग्रामीण मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरून मराठी शाळा गुणवत्तेत कुठेच मागे नाही,,यासाठी ज्ञान रचनावादी अध्ययन अध्यापणावर आधारित स्वरचित साहित्य तयार केले स्वतःची वर्गखोली स्वतः च्या हाताने चित्र पेंटिंग करून वर्ग बोलके केले महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन वाढत्या वयातील मुलींची शारीरिक व मानसिक काळजी कशी घ्यावी याबाबत महिलांचे मार्गदर्शन वर्ग घेतले इंग्रजी भाषा आवड निर्माण करण्यासाठी ब्रिटिश कौंशील व टॅग सारखे प्रशिक्षणासाठी सहभाग घेतला.
मुलींना क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शन करून शाळेसाठी भरीव लोकसहभाग मिळवण्यासाठी शाळेतील सहयोगी शिक्षकांना मदत केली त्यांच्या वर्गातील मुलांनी स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केली आहे।दप्तरविना शाळा ,रांगोळी ,चित्रकला,निबंध ,क्रिडा स्पर्धा आयोजित केली।वर्गातील अभ्यासाच्या पीपीटी तयार करून डिजिटल साहित्याचा वापर केला ।शासकीय योजना व उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असतो. त्याना मिळालेला पुरस्कार आपल्या विध्यार्थयाना समर्पित करून यात माझ्या सर्व शिक्षक बंधू व अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. स्मिता देसले हे जिप शाळा पळासखेडे ता पारोळा येथील उपशिक्षक महेंद्र देवरे यांच्या पत्नी आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापिका सौ सुमन गोपीनाथ पाटील यांच्या स्नुषा आहेत त्यांच्या पुरस्काराबाबत सांगवी शालेय व्यवस्थापन समिती, ग शि, पारोळा सी एम चौधरी, केंद्र प्रमुख गोविंदा मिस्तरी, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे जिल्हापुरस्कार प्राप्त मुख्याद्यापक विजय भामरे,पदवीधर शिक्षक आण्णा चौधरी,तज्ञ संचालक राजेंद्र पाटील, तंत्रस्नेही कैलास मोरे, सुनील जाधव,उपशिक्षक दिलीप अहिरे सर्व शिक्षक संघटना यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेछ्या दिल्यात.