अमळनेर (प्रतिनिधी):- जि.प. शाळा जळकेतांडा येथील सर्व विद्यार्थ्यांना रोटरी क्लबऑफ जळगाव सेंट्रलच्या वतीने दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.नमकीन साहीत्य अध्यक्षा अपर्णा भटकासार , .राजू दोषी,.रविंद्रदादा वाणी ,विद्या चौधरी ,शाळेतील शिक्षक सोमनाथ पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या शाळेत दिवाळीत फराळ वाटपाचा कार्यक्रम मागील सहा वर्षे पासून अखंड सुरू असल्याचे शाळेतील शिक्षक सोमनाथ ब्रिजलाल पाटील यांनी सांगितले तसेच वंचितां सोबत दिवाळी साजरी करण्याचे समाधान असल्याचे सोमनाथ पाटील यांनी सांगितले .