Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»जि.प व पं.स. सदस्य असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षपदी प्रभाकर सोनवणे
    जळगाव जिल्हा

    जि.प व पं.स. सदस्य असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षपदी प्रभाकर सोनवणे

    Tushar BhambareBy Tushar BhambareApril 18, 2021Updated:April 18, 2021No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनवेल ता.यावल ( प्रतिनिधी ) जिल्ह्याच्या मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे गटनेते  प्रभाकर अप्पा सोनवणे यांची निवड कैलास गोरे पाटील राष्ट्रीय सरचिटणीस यांनी पत्र पाठवून  केली आहे . सदरचे निवड पत्र हे प्रभाकर अप्पा सोनवणे यांना प्राप्त झाले असल्याची माहीती अप्पा यांनी दिली  . याबाबत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल, . रासरचिटणीस  कैलास गोरे पाटील व मार्गदर्शक राम जगदाळे यांचेकडील नियुक्ती पत्रावर यांच्या स्वाक्षरी आहे . जिल्हा परिषद सदस्य व खेडयापाडयातील व दुर्गम भागातील नागरीकांचे विकासात्मक दृष्टीकोण व ग्रामीण पातळीवर सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या संघटनेची आवश्यकता असुन त्याची जाणीव ठेवुन जिल्हापरिषद सदस्यांची संघटना स्थापन करण्यात आली आहे . शासनाकडुन येणाऱ्या निधीचा जिल्हा परिषदेत समान वाटप होवून कुठल्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही व शासकिय कामांत दैनंदीन येणाऱ्या अडीअडचणी व त्यांचे प्रश्न सोडविण्याच जिला परिषद संघटनेकडुन प्रश्न सोडविला जाणार असल्याची माहीती जिल्हा अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी दिली .जिल्हा परिषद सदस्य असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रावेर यावल आ.शिरीष चौधरी ( महाराष्ट्र प्रदेश कँग्रेस कमिटी ). उल्हास पाटील .( प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष ) संदीप भैय्या पाटील ( कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष जळगांव ) भगतसिंग पाटील (जिल्हा अध्यक्ष इंटक ), माजी आ . रमेशदादा चौधरी, हाजी शब्बीर खान ( जिल्हा उपाध्यक्ष कॉग्रेस ), वसंत रामजी महाजन (माजी प्रतोद कॉग्रेस ), जिल्हा परिषद सदस्य आर जी पाटील . सौ . सुरेखाताई पाटील, पं .स . चे माजी सभापती लिलाधर विश्वनाथ चौधरी,  बामणोद चे माजी सरपंच शिवराम किसन  तायडे  ., पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, पंस सदस्य -सरफराज तडवी, सौ . कालिमा तडवी, कृउबा माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी, यावल न पा गटनेता सय्यद युनुस सय्यद युसुफ , फैजुर गट नेता नपा कलीम मन्यार, काँग्रेसचे यावल शहर अध्यक्ष कदीर खान, माजी सभापती उपसभापती उमाकांत रामराव पाटील फैजपुर शहर काँग्रेस अध्यक्ष रियाज भाई यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.

    जळगाव जिल्हा परिषद चे एकुण ६७ सदस्य व जिल्ह्यात १३४पंचायत सदस्य असुन, असोसिएशन महाराष्ट्र जळगाव जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी माझ्यावर जी जबाबदारी संघटनेने सोपवली असून ती जबाबदारी पूर्णपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेल सध्या जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार कमी करण्यात आली असून ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी खूप अडचणी येत आहे परंतु संघटनेच्या माध्यमातून सर्वपक्षीय जि.प. सदस्यांना सोबत घेवुनआवाज उठून निश्चीत प्रयत्न करू आणि या संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे पाटील व मार्गदर्शक राम जगदाळे नवी मुंबई आणि नवी मुंबई शिवसेना नगरसेवक संजूभाऊ वाडे यांच्यासह सर्वांचेच त्यांनी आभार व्यक्त केले आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026

    आई अन् मुलाने घेतला पैशाच्या वादातून बापाचा जीव!

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif