जि. पं. सभेत सत्ताधार्‍यासह विरोधी सदस्यांचा गदारोळ

0

जि.प.अध्यक्षांचे 9 अतिरिक्त प्रस्ताव रद्द करा : सिंचनसह आरोग्य विभागाच्या तक्रारी मोठया प्रमाणावर

जळगांव.दि25-
जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेत साकरी पाझर तलावातील गौण खनीज मुरूम काढण्याची जिल्हाधिकारी यांनी रीतसर परवानगी दिली असल्यास त्याचे पत्र सभागृहात सादर करा असे जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी सिंचन अभियंता राजन नाईक यांना माहीती विचारली असता जिल्हाधिकारी यांनी 20 हजार ब्रास दि.1सप्टेबर 2018 व 44 हजार ब्रासची परवानगी17 डिसेंबर 2018 रोजी लेची पत्राव्दारे दिली असल्याचे सांगीतल्या नंतर सदस्या सावकारे यांनी तशी कोणतीही परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिलेली नाही तसेच या पत्रावर गट नं. देखिल नमूद केलेला नाही हे जिल्हाधिकारी यांचे पत्र सभागृहात दाखविले.
त्याचवेळी जि. प.अध्यक्षांनी 9 अतिरीक्त कामांना प्रशासकिय मान्यता परवानगी दिल्याची माहिती सादर केल्यावर सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यांनी गदारोळ करत अतिरीक्त प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली.
गेल्या वर्षभरापासून अध्यक्ष व सत्ताधारीसह विरोधी सदस्यांमधे समान निधीवाटपावरून अंतर्गत मतभेद होते हे नेहमीच सर्वसाधारण, स्थायी तसेच अन्य सभांमधून दिसून येत होते. याचा प्रत्यय आज जि.प.अध्यक्षांनी इतर सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर 9 अतिरीक्त प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केलेले आहेत. या अतिरीक्त कामांना निधी तरतुद कोणत्या विभागातुन देय आहे. ठरावाविनाच 9 अतिरीक्त कामे अध्यक्षांनी सादर केली असून सभागृहाच्या कामकाजा विरूद्ध आहे. ते रद्द करण्यात यावे. अन्यथा सर्वच सदस्यांना कामांची मान्यता देण्यात यावी. अशी मागणी विरोधी पक्ष नेते मनोहर पाटील, भाजपाचे मधुकर काटे, नानाभाउ महाजन, रविंद्र पाटील, शशिकांत साळुंखे यांचेसह सर्वच सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधी सुर मांडला होता. यावर जि.प.अतिरीक्त सीईओ संजय मस्कर यांनी हा मुद्दा सदस्यांनी परस्पर संमतीने सोडवावा प्रशासन यात काहीही मदत करू शकणार नाही. असे सांगीतले.
टंचाई, विंधनविहीरी, हातपंप, आरोग्यासह सिंचन विभाग चौकशीच्या रडारवर
जिल्हयात सद्यस्थितीत दुष्काळी परीस्थिती असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विंधन विहीरी, टँकर मागणीचे प्रस्तावांना तत्काळ मंजुरी प्राधान्य देण्यात येत असले तरी संबंधित अभियंता मोरे हे ठेकेदाराला देयके मंजुर होणार नाहीत, तुमच्या जबाबदारीवर कामे करा असे ठेकेदारांना सांगून कामे करण्यापासून थांबबत आहेत तर काही ठिकाणी विंधन विहीरींना पाणी असून देखिल पाणी नाही असे खोटे सांगून हातपंंप व बोअरवेल पंप बसविणेसाठी टाळाटाळ करीत आहेत. सदस्यांचे फोन स्विकारत नाहीत, असे सदस्य प्रताप पाटील यांनी सांगीतल्यावरून सीईओ डॉ. बी.एम.पाटील यांनी यासंदर्भात चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगीतले. भडगांव तालुक्यात जलयुक्तची कामे सन 2015-16 पासून रखडली असून रोहयोअंतर्गत पाचोरा तालुक्यात 429 विहिरींच्या कामांना मान्यता देण्यात आली असून 275 कामांचे जिओ टँगीग झाले असून 243 कामे काम थांबवण्यात आल्याने अपूर्ण आहेत. विहिरींच्या कामांना प्रशासकिय मान्यता पाचोरा गटविकास अधिकारी यांच्या मार्फत मान्यता देण्यात आली असली तरी सद्यस्थितीत थांबवण्यात आलेली आहेत. संबंधित शेतकरी वारंवार संदस्यांकडे विचारणा करीत असतात यासंदर्भात डेप्युटी सीईओ बोटे यांनी शासनाकडूनच कामे थांबवण्याचे आदेश असल्याचे सांगीतल्या वरून हे आदेश आताचे आहेत. गत दोन वर्षापुर्वी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या अधिकारांतर्गत कामांची प्रशासकिय मान्यता विनाकारण रद्द करण्यात आली असून रोहयो कामाचे संबंधित आधिकारी चित्ते हे मनमानी पणे कारभार करीत असल्यामुळे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जि.प.सदस्य मधुकर काटे व मनोहर पाटील यांनी मांडली. रोहयो कामासंदर्भात दिरंगाई करणार्‍यावर चौकशी समिती स्थापन करून कारवाई करण्याची मागणी काटे व इतर सदस्यांनी मांडली असता नियमांनुसार योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सीईओ डॉ.बी.एम.पाटील यांनी सांगीतले.
आरोग्य विभाग व बांधकामासह शिक्षण विभागच सभागृहाचे लक्ष
राज्यात गोवर रूबेला लसीकरणात जिल्हा आरोग्य प्रशासनाने आघाडी घेतली म्हणून प्रशासनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर सर्वात जास्त तक्रारींचा जोर आरोग्य विभागावरच दिसून आला. बर्‍याच ठिकाणी प्रा.आ केंद्र जीर्णावस्थेत असल्या कारणाने दुरूस्ती तर काही ठिकाणी जागा उपलब्ध नाही, बांधकाम अपूर्णावस्थेत तर सुधारीत प्रस्तावास मान्यता देण्यावरूनच सदस्य पदाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्यावर उपाध्यक्ष यांनी प्रश्नांचा भडीमार केला. रूईखेडा प्रा.आ केंद्रातील कर्मचारीवर्गाचे वेतन 5 महिन्यापासून प्रलंबित आहे. तेथील कर्मचारी वैद्यकिय अधिकार्‍याच्या दडपणाखाली काम करतात, तेथे तक्रार पुस्तकच नाही, एएनएमची पदे रिक्त आहेत, चाळीसगांव तालुक्यातील शिंदी येथे आरोग्य केंद्रात अ‍ॅन्टीरेबीजची लस वेळेवर उपलब्ध होत नाही, रूग्णांना ती लस मोफत असतांना खाजगी रूग्णालयातुन महाग किमतीत घ्यावी लागते अशी तक्रार मांडली. तर जि.प.च्या शाळाखोल्या निर्लेखन ठरावानुसार होत असून प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आले आहे.गेल्या दिड वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे प्रस्ताव असून पाठपुरावा व अंमलबजावणी करण्याची जबांबदारी सबंधित बांधकाम अभियंते यांची आहे असे उपाध्यक्ष महाजन यांनी सांगीतले.
कामकाज कसे करावे हे शिकवू नका-उपाध्यक्ष महाजन
शिरसोली परीसरातील जैन नॉलेज इन्स्टीट्युटसाठी पाझर तलावाची देखभाल करण्यासाठीचा प्रस्ताव 30 वर्षांसाठी असून संबंधित संस्था हि या कामाचा उपयोग व्यावसायीक म्हणून करीत आहे. कांताई बंधारा देखिल अशाच कामासाठी वापर होत आहे त्यामुळे अशा प्रस्तावांना मान्यता देताना व्यावसायीकतेला प्राधान्य देवू नये अशी सूचना जि.प.सदस्य गोपाल पाटील यांनी मांडली असता कामकाज कसे करावे असे जि.प.उपाध्यक्ष यांनी सांगताच हि लोकशाही आहे. आम्ही तो कसा मांडावा यावर या 30 वर्ष कराराऐवजी 11 वर्षाचा करार करावा व दर पाच वर्षांनी कराराची रकम वाढविली जावी अशी सूचना नानाभाउ महाजन यांचेसह सर्वच सदस्यांनी मांडली.

काम वाटपावरून सुरू झालेले वादंग समान निधी वाटपाने शमले होते. मात्र अध्यक्षांनी सिंचनमध्ये अतिरिक्त कामे घेत त्यात कोणालाही विश्वासात न घेता परस्पर प्रशासकीय मान्यता घेतल्याचा आरोप करत सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी आज जिल्हापरिषदेत सभेत वाद घातला. त्यातून आज पुन्हा अध्यक्षा एकाकी पडल्याचे चित्र दिसून आले. यावरून अध्यक्ष- उपाध्यक्ष भिडले
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात सर्वसाधारण सभा आज (ता.25) अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समान निधी वाटपानंतर सिंचनाच्या अतिरिक्त कामांना मंजुरी देण्यात आली आहे का? असा सवाल सत्ताधारी गटातील भाजपचे सदस्य जयपाल बोदडे यांनी उपस्थित केला. शिवाय, अतिरिक्त कामांना प्रशासकीय मंजुरी देणार्‍यांवर कारवाई करण्याबाबत पत्र दिले असून सिंचनाचे कार्यकारी अभियंता आर. के. नाईक यांच्यावर कारवाईची मागणी केली. या मुद्यावरून मधुकर काटे, विरोधी सदस्य रावसाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, शशिकांत साळुंखे, आत्माराम कोळी यांनी देखील समान निधी वाटपानंतर अध्यक्षांनी अतिरिक्त कामे घेतली तर सर्वांना अतिरिक्त कामे मिळावी; अन्यथा प्रशासकीय मंजुरी रद्द करण्याबाबत आवाज उठविला.

Leave A Reply

Your email address will not be published.